‘देनिसची वाडी’ ही लघुकादंबरी वाचकाला वास्तवाचे भान करून देतानाच अंतर्मुख करून जाते. निसर्गवेड्या आबाची आणि त्याच्याशी नकळत नाळ जुळलेल्या नायक-निवेदकाची ही सर्वस्पर्शी कथा. अनुभव, निरीक्षण, स्मरण, चिंतन यांच्या अभिसरणातून ती फुलत जाते. खोट्या विकासामागे पळताना आपण काय काय गमावतोय, याची वेदनादायक जाणीव देतानाच ती एका आश्वासक वळणावर विसावते; पुढील भागाची उत्सुकता कायम ठेवून!