रात्रीच्या आकाशाकडे पहात असताना विश्वाच्या गूढ गोष्टींबद्दल कुतूहल असलेल्या प्रत्येकासाठी एक पुस्तक- 'मैत्री ग्रह तार्यांशी भाग १'.
ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून तारे आणि ग्रह यांच्याशी मानवजातीचे संबंध उलगडणारे पुस्तक. आपल्यासाठी पुढे काय आहे? यशस्वी होण्यासाठी आपण कोणते मार्ग अवलंबू शकतो? निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे यांची उकल करण्याच्या उद्देशानेच तारे व ग्रह अस्तित्त्वात आहेत. ज्यांना त्यांचे भविष्य जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी त्यांनी पत्रिका स्वरूपात एक 'रोड-मॅप' प्रदान केला आहे आणि अशा प्रकारे हे आकाशीय मार्गदर्शक वास्तवात आपले मित्रच आहेत! ज्योतिषाच्या नवशिक्या अभ्यासकांना या जटिल विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी रेखा छत्रे रहाळकर यांचे सोप्या पण स्पष्ट मराठी शैलीत लिहिलेले 'मैत्री ग्रह तार्यांशी भाग १' हे पुस्तक नक्की उपयुक्त ठरेल.